Sections

उन्नाव बलात्कारप्रकरण ; भाजप आमदाराकडून पीडितेच्या कुटुंबियांना धमकी

वृत्तसंस्था |   रविवार, 15 एप्रिल 2018
Crime News Unnao rape case BJP MLA Kuldeep Singh Sengars goons allegedly threaten villagers 2 people missing

उन्नाव सामूहिक बलात्कारप्रकरण उघडकीस आल्यानंतर देशभरात या घटनेवरून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. याप्रकरणात भाजपचे आमदार सेंगर यांचा समावेश असल्याचा आरोप पीडित तरुणीकडून करण्यात आला आहे.

लखनौ : उन्नाव येथील एका 18 वर्षीय मुलीने भाजपचे आमदार कुलदीपसिंह सेंगर आणि त्यांच्या भावांनी आपल्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप केला. त्यानंतर या आरोपावरून सेंगर याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आता सेंगर याच्या गुंडांकडून पीडित तरुणीच्या कुटुंबियांना धमकी देण्यात आली असून, पीडितेच्या कुटुंबियातील दोन जण बेपत्ता झाले आहेत. 

Unnao rape case

उन्नाव सामूहिक बलात्कारप्रकरण उघडकीस आल्यानंतर देशभरात या घटनेवरून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. याप्रकरणात भाजपचे आमदार सेंगर यांचा समावेश असल्याचा आरोप पीडित तरुणीकडून करण्यात आला आहे. त्या आरोपावरून आमदार सेंगर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर आता आमदार सेंगर यांच्या गुंडांकडून आपल्यावर दबाव टाकण्यात येत असून, धमक्याही दिल्या जात आहेत, असे पीडित तरुणीच्या चुलत्याने सांगितले.  

दरम्यान, उन्नाव येथील बलात्कारप्रकरण समोर आल्यानंतर पीडित तरुणीच्या वडिलांना सेंगर आणि त्यांच्या भावांकडून मारहाण करण्यात आली होती. एवढे होऊनही या उलट पीडितेच्या वडिलांनाच पोलिसांनी अटक केली होती. पोलिस कोठडीत पीडितेच्या वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर हे प्रकरण चर्चेत आले. आपल्या वडिलांच्या कोठडीतील मृत्यूला आमदार सेंगर हेच कारणीभूत असल्याचा आरोपही पीडित मुलीने केला.

Web Title: Crime News Unnao rape case BJP MLA Kuldeep Singh Sengars goons allegedly threaten villagers 2 people missing

टॅग्स

संबंधित बातम्या

विसर्जनासाठी ‘यिन’चे हात सरसावले

पिंपरी - गणपती विसर्जनासाठी पोलिस फ्रेंड्‌स वेल्फेअर व यिनच्या वतीने मूर्ती दान व वाहतूक नियोजन करण्यात आले. चिंचवड येथील चाफेकर चौक व पवना घाट या...

वाशीत ७१ हजारांचे दागिने पळवले

नवी मुंबई - एका ६२ वर्षांच्या महिलेचे ७१ हजार रुपये किमतीचे दागिने एका भामट्याने लुबाडून नेल्याची घटना गुरुवारी (ता. २०) भरदुपारी वाशीतील सेक्‍...

पोलिसांना ‘घरचा डबा’

वाल्हेकरवाडी - सण, उत्सव हे सुरळीत पार पडून शांतता कायम राहावी, या उद्देशाने रात्रंदिवस खडा पहारा देणाऱ्या कर्तव्यदक्ष पोलिस बांधवांना व पोलिस...

File photo
हॉटेल गंगाकाशीमधील "सेक्‍स रॅकेट'चा भंडाफोड

हॉटेल गंगाकाशीमधील "सेक्‍स रॅकेट'चा भंडाफोड नागपूर : हॉटेल गंगाकाशीमधील हायप्रोफाइल सेक्‍स रॅकेटवर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने सोमवारी...

मिरवणुकीत आपलेपणाचे दर्शन

पुणे - एकीकडे हजारो नागरिक आपल्या लाडक्‍या बाप्पाला निरोप देत होते; पण दुसरीकडे कोणी मिरवणूक पाहायला येणाऱ्या भक्तांना अन्नवाटप करत होते, तर कोणी...