Sections

सीबीएसई: बारावीचा अर्थशास्त्राचा पेपर 25 एप्रिलला 

वृत्तसंस्था |   शनिवार, 31 मार्च 2018
paper leak

"सीबीएसई' परीक्षांच्या प्रश्‍नपत्रिका परीक्षेआधीच फुटल्या हा मुळात सरकारचा हलगर्जीपणा आहे. पण स्वत:ची चूक सुधारायची किंवा मान्य करायची सोडून विद्यार्थ्यांना पुन्हा कसल्या परीक्षा द्यायला लावत आहेत? सरकारला प्रश्‍नपत्रिका गोपनीय ठेवता येत नसेल तर त्यात विद्यार्थ्यांचा काय दोष? त्यांनी का पुन्हा परीक्षा द्यायची? 
राज ठाकरे, अध्यक्ष मनसे 

नवी दिल्ली : पेपरफुटीमुळे चौफेर टीकेला सामोरे जाणाऱ्या केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा परीक्षेच्या हॉलमध्ये आणले आहे. इयत्ता बारावीच्या अर्थशास्त्र विषयाची फेरपरीक्षा 25 एप्रिल रोजी होणार असून, दहावीच्या गणिताचा पेपरही जुलैमध्ये होण्याची शक्‍यता असून, याबाबत पुढील पंधरा दिवसांमध्ये निर्णय होणार असल्याचे शिक्षण सचिव अनिल स्वरूप यांनी सांगितले. 

दहावीच्या विद्यार्थ्यांना मात्र परीक्षेबाबत थोडासा दिलासा मिळण्याची शक्‍यता असून, पंजाब आणि हरियानापुरतीच या विषयाची परीक्षा घेतली जाऊ शकते. पण सगळीकडेच हा पेपर फुटला असेल, तर मात्र गणिताचा पेपर पुन्हा जुलैमध्ये होऊ शकतो, इयत्ता बारावीची फेरपरीक्षा होणे गरजेचे आहे; कारण या विद्यार्थ्यांना पुढे विद्यापीठ प्रवेशासाठी प्रयत्न करायचे असतात, असेही स्वरूप यांनी स्पष्ट केले. दरम्यान "सीबीएसई'च्या पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असून, संतप्त विद्यार्थ्यांनी आज दिल्लीसह अन्य शहरांमध्येही आंदोलने करत आपला रोष व्यक्त केला.

विविध राजकीय पक्ष आणि संघटनांनीही विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला असून, कॉंग्रेसप्रणीत "एनएसयूआय'च्या कार्यकर्त्यांनी तर दिल्लीमध्ये "सीबीएसई'च्या मुख्यालयासमोर आंदोलन केले. या पेपरफुटीमुळे देशभरातील वीस लाखांपेक्षाही अधिक विद्यार्थ्यांना फटका बसला आहे. 

झारखंडमध्ये सहा विद्यार्थ्यांना अटक  कोचिंग सेंटर मालकांनाही बेड्या  पोलिस, विभागीय पातळीवर तपास  सोशल मीडियातील प्रश्‍नपत्रिका खोट्या  दिल्ली पोलिसांनी मागितली गुगलकडे मदत  दहा व्हॉट्‌सऍप ग्रुप चौकशीच्या रडारवर 

"सीबीएसई' परीक्षांच्या प्रश्‍नपत्रिका परीक्षेआधीच फुटल्या हा मुळात सरकारचा हलगर्जीपणा आहे. पण स्वत:ची चूक सुधारायची किंवा मान्य करायची सोडून विद्यार्थ्यांना पुन्हा कसल्या परीक्षा द्यायला लावत आहेत? सरकारला प्रश्‍नपत्रिका गोपनीय ठेवता येत नसेल तर त्यात विद्यार्थ्यांचा काय दोष? त्यांनी का पुन्हा परीक्षा द्यायची? राज ठाकरे, अध्यक्ष मनसे 

Web Title: CBSE paper leak 12 th class economic paper rescheduled

टॅग्स

संबंधित बातम्या

पालिकेच्या सीबीएसई शाळांत प्रवेश सुरू 

नवी मुंबई - नवी मुंबई महापालिकेच्या कोपरखैरणे सेक्‍टर- 11 व नेरूळ सेक्‍टर- 50 येथील सीबीएसई शाळांची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. 2019-20 या...

Rahul-Jadhav
पर्यावरणासाठी नदी स्वच्छता हवी - महापौर राहुल जाधव

पिंपरी - ‘‘पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी व प्रदूषणमुक्त शहर बनविण्यासाठी इंद्रायणी नदी स्वच्छता अभियानासारखे उपक्रम सातत्याने राबविले गेले पाहिजेत...

deepak pawar
मराठीला कोलू कवतिके!

महाराष्ट्र राज्याची स्थापना १९६०ची. गेल्या ५८ वर्षांत विविध व्यवहारक्षेत्रांमध्ये मराठीचा वापर अनिवार्य करायला हवा होता. ते न करता आपण अमराठी...

File photo
सरकारी शाळेत दप्तर वजनदार

सरकारी शाळेत दप्तर वजनदार नागपूर : केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाद्वारे दिलेल्या निर्देशाप्रमाणे गुरुवारी (ता. 29) राज्यातील पन्नास शाळांमधील...

Sakal-Exclusive
प्रशिक्षणातील गांभीर्याच्या अभावामुळे सराव प्रश्‍नपत्रिकेची नामुष्की

नागपूर - शालेय शिक्षण विभागाकडून दहावीच्या बदललेल्या अभ्यासक्रमाचे शिक्षकांना उन्हाळ्यात प्रशिक्षण देण्यात आले. मात्र, एका दिवसाच्या प्रशिक्षणात...

Education
उद्योगनगरी ते शिक्षणाची पंढरी

पिंपरी-चिंचवडची ‘औद्योगिकनगरी’ वाटचाल आता ‘शिक्षणाची पंढरी’कडे होत आहे. येथील विद्यार्थ्यांचा कला, साहित्य, सांस्कृतिकपाठोपाठ आता सायन्स, मॅनेजमेंट,...