Sections

जगदीश मेटगुड, श्रीमंत पाटील यांना काँग्रेसची उमेदवारी 

सकाळ वृत्तसेवा |   रविवार, 15 एप्रिल 2018

बेळगाव - कॉंग्रेसतर्फे आज उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये निवडणूकीच्या तोंडावर कॉंग्रेस पक्षात प्रवेश केलेल्या जगदीश मेटगुड, श्रीमंत पाटील यांचा समावेश आहे. तर बेळगाव दक्षिण मतदार संघातून एम. डी. लक्ष्मीनारायण, बेळगाव ग्रामीणमधून लक्ष्मी हेब्बाळकर, बेळगाव उत्तर फिरोज सेठ यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. 

बेळगाव - कॉंग्रेसतर्फे आज उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये निवडणूकीच्या तोंडावर कॉंग्रेस पक्षात प्रवेश केलेल्या जगदीश मेटगुड, श्रीमंत पाटील यांचा समावेश आहे. तर बेळगाव दक्षिण मतदार संघातून एम. डी. लक्ष्मीनारायण, बेळगाव ग्रामीणमधून लक्ष्मी हेब्बाळकर, बेळगाव उत्तर फिरोज सेठ यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. 

भाजपतर्फे बैलहोंगल येथून विद्यमान आमदार डॉ. विश्‍वनाथ पाटील यांना उमेदवारी जाहीर केली. यामुळे भाजपचे इच्छूक उमेदवार व माजी आमदार जगदीश मेटगुड यांनी नाराजी व्यक्त केली. त्यांनी भाजपला रामराम करून कॉंग्रेसकडे उमेदवारीसाठी मागणी केली. मागणीला सकारात्मक प्रतिसाद पक्षाने दिला आहे. कॉंग्रेसने पहिल्या यादीत मेटगुड यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे भाजपला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. शिवाय भाजपला येथून कडवे आव्हान मिळणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. 

धजद पक्षाला रामराम करून अलिकडे श्रीमंत पाटील यांनी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. पहिल्या उमेदवारी यादीत पाटील यांनाही उमेदवारी जाहीर झाली आहे. यामुळेच येथून धजदसह भाजप आमदार राजू कागे यांना कडवे आव्हान मिळणार आहे.

राज्यात कॉंग्रेस पक्षाच्या 12 आमदारांना उमेदवारी नाकारली आहे. दुसरीकडे राज्यात धजद पक्षातून कॉंग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेल्या 7 आमदारांना कॉंग्रेस पक्षाने उमेदवारी जाहीर केली आहे. याप्रमाणे बेळगाव जिल्ह्यात भाजप व धजदमधून कॉंग्रेस पक्षात प्रवेश केलेल्या दोघांसाठी उमेदवारी जाहीर केली आहे.  बेळगाव दक्षिण मतदार संघातून विधान परिषद सदस्य एम. डी. लक्ष्मीनारायण, बेळगाव ग्रामीण लक्ष्मी हेब्बाळकर, चिक्कोडी सदलगा येथून गणेश हुक्केरी, गोकाक रमेश जारकीहोळी, यमकनमर्डी सतीश जारकीहोळी, खानापूर अंजली निंबाळकर, रामदूर्ग अशोक पट्टण यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. दुसरी यादी येत्या दोन दिवसांत जाहीर केली जाणार आहे. 

 

Web Title: Belgaum News congress membership LaxmiNarayan from Belgaum south

टॅग्स

संबंधित बातम्या

भाजपने देशावर संविधान बचावची वेळ आणली - राष्ट्रवादी महिला काँग्रेस 

कोल्हापूर -  भाजप सरकारने देशावर संविधान बचावची वेळ आणली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या मंत्रीमंडळातील सहकारी हेगडे हे तर संविधान बदलण्यासाठी...

2ajit_pawar_26.jpg
मराठवाड्यात तत्काळ दुष्काळ जाहीर करा : अजित पवार 

औरंगाबाद : मराठवाड्यातील अनेक भागात भर पावसाळ्यात टँकरने पाणी पुरवठा केला जात असून पावसाअभावी पिके करपली आहेत. त्यामुळे खरीपाची सर्वच पिके हातची...

सांगली महापालिकेच्या स्थायी सभापतीपदी अजिंक्‍य पाटील निश्‍चित

सांगली - सांगली मिरज कुपवाड शहर महापालिका स्थायी समिती सभापतीपदी अपेक्षेनुसार माजी आमदार दिनकर पाटील यांचे पुत्र अजिंक्‍य पाटील यांची निवड निश्‍चित...

"प्रदूषण टाळा-नदी वाचवा' या संकल्पनेवर किर्लोस्कर वसुंधरा चित्रपट महोत्सव

कोल्हापूर - येथे एक ऑक्‍टोंबरपासून रंगणाऱ्या नवव्या किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्‌घाटन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व...

Untitled-1.jpg
पुत्रप्रेमापोटी बागवेेंचे खोटे आरोप : गोगावले

पुणे  : ''काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे आणि अन्य नेत्यांनी भाजपवर केलेले आरोप हे राजकीय असून अविनाश बागवे आणि काँग्रेसच्या...