Sections

साहित्य शिरोमणी कवि कुसुमाग्रज..... 

सुनेत्रा विजय जोशी  |   सोमवार, 26 फेब्रुवारी 2018

कुसुमाग्रज म्हणजे... 
एकच ध्रुव तारा अढळ नभी 
लाख तारका जरी चमचमती
लाख दिव्यांची झगमग माळा
एक अखंड तेजोमय साहित्याची पणती... 

आपल्या प्रतिभेने मराठी साहित्य समृद्ध करणाऱ्या साहित्यिकांमध्ये ज्ञानपीठ पारितोषिक विजेते वि. वा. शिरवाडकर उर्फ कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्म 27 फेब्रुवारीला झाला. मराठी साहित्यातील त्यांच्या योगदानाबद्दल हा दिवस मराठी भाषा दिन म्हणुन साजरा केला जातो. 

"माझ्या मराठी मातीचा लावा कपाळास टिळा तिच्या संगाने जागल्या दऱ्याखोऱ्यातील शिळा."

अशा शब्दांत महाराष्ट्राचा गौरव ज्यांनी केला त्यांना कुठल्याही सन्मान म्हणजे त्या सन्मानाचाच सन्मान आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. ते म्हणतात 

"तुम्ही जेव्हा माझ्या कवितेशी बोलता तेव्हा माझ्याशी बोलु नका कारण माझ्या कवितेत मी असेन बराचसा बहुदा.  पण माझ्या बोलण्यात मात्र  तुम्हीच असाल पुष्कळदा... 

कथा,  कविता, नाटक, कादंबरी, लघुनिबंध हे सगळे प्रकार त्यांनी लिलया हाताळले. त्यांच्या पुस्तकांची नावे सांगितली तर बाकी लिहीताच येणार नाही काही. काही वेगळे अन् भावलेले त्यांच्या "वेडात मराठे वीर दौडले सात" ही कविता जेव्हा आणि जितक्या वेळा ऐकली तरी अंगातील रक्त प्रत्येक वेळी तेवढ्याच वेगाने दौडते. किंवा "पृथ्वीचे प्रेमगीत" वाचल्यावर यापेक्षा उत्कट प्रितीची व्याख्या असुच शकत नाही असे वाटते. 

खरेतर त्यांच्या प्रत्येक कवितेत त्या त्या भावना खुप उत्कट आहेत. काहीतरी सतत टोचत राहीले तर जसा रक्त स्त्राव वाहता राहतो. तसेच कविमनाला समाजातले किंवा त्यांच्या आजुबाजुला घडणारे क्वचित स्वतःच्या आयुष्यातील काही गोष्टी सतत टोचत राहतात आणि त्यातुन मग हा काव्याचा किंवा साहित्याचा स्त्राव वाहता राहतो. 

त्यांना वाचकांकडून आलेल्या पत्रांना ते स्वतः पोस्टकार्ड लिहून उत्तर द्यायचे. तसेच रात्री दुरवर फेरफटका मारून आले की लिहायला बसायचे. मला खुप आवडलेली आणि त्याहून खरं सांगायच तर जो ही कविता वाचेल त्याला ती त्याचीच वाटेल अशी. प्रत्येकाची दोन रूपे असतात. आणि ती दोन्ही एका शरीरात राहतात.

"आम्ही दोघे" या कवितेत खुपच प्रभावीपणे आलेय. मी आणि मी आम्ही दोघे एका घरामधले रहिवासी  दोन गावचे दोन दिशांचे हा रत येथे हा वनवासी..  हा व्यवहारी रंगुन जातो हिशोब करतो रूपये आणे नक्षत्रांच्या यात्रेतील तो ऐकत राही अबोध गाणे...

मित्रसख्यांचा मेळा येथे तेथे त्याचे विसावते मन हा एकाकी विरहव्यथेला नाही त्याच्या कुठले सांत्वन..  नीतिरितिचा विवेक याला प्रवाह घाटामधुनी वाहे स्वैर अनागर नागर जरी तो कसले बंधन त्या न साहे.  अलिपरी हा गर्दीमधुनी विहार करतो रसज्ञ मार्मिक  शुन्य पथी तो चिरंतनाच्या ओझे घेऊन चाले यात्रिक.  मी आणि मी आम्ही दोघे वसतिसाठी एक परी घर दोन ध्रुवांचे मिलन येथे दोन ध्रुवांतिल राखुन अंतर... 

या कवितेत प्रत्येकाला त्याच्यातील दोघे सापडल्यावाचुन राहणारच नाही. गर्जा जयजयकार क्रांतीचा या कवितेनी तर कैक तरूणांना स्वातंत्र्य लढ्यात लढण्याची अन देशप्रेमाची प्रेरणा दिली. त्यांच्या नटसम्राट या नाटकाला तर साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. मेघदुताचे भाषांतर पण अप्रतिम. आपल्याला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्या असंख्य लोकांनी बलिदान दिले त्यांच्यासाठी कुसुमाग्रजांच्या मनात अमाप कृतज्ञता आहे. त्यांच्या "स्मरण" या कवितेत ते म्हणतात. नव्हे आपल्याला देखिल विचारतात. 

आज प्रकाशातुन चालता मुक्तपणे यात्रिका स्मरशील का त्या तिमिरामधल्या शतावधी तारका? 

याच कवितेत शेवटी ते म्हणतात. 

खुशाल लोपो कालरथाची अखंड आहे गती पांथा क्षणभर थांबून केवळ आठव ती आहुती... 

निदान आपण त्यांचे स्मरण तरी ठेवावे. खरच ती पुर्ण कविता वाचतांना अंगावर शहारा आल्यावाचुन राहत नाही. 

त्यांच्या कितीतरी कवितांची अजरामर गीते झालीत. त्यांचा साहित्य प्रवास इतका मोठा आहे की सगळे इथे या एवढ्याश्या लेखात बंदिस्त नाहीच करता येणार. काही बोलायचे आहे, पण बोलणार नाही, असे म्हणत तो कवि आपल्याला त्याच्या कवितेतुन खुप काही सांगुन गेला. पण त्यांच्या कवितेत असलेले व त्या मागे असलेले पण शब्दात नसलेलेही जर आपण ओळखु शकलो, तर ती खरी ओळख. त्याच्याच शब्दात म्हणजे "असेल काही पण पलिकडचा मी जर तुजला दिसलो नाही. म्हणेन परिचय झाला अपुला परंतु ओळख झाली नाही". 

असा हा काव्यतारा 10 मार्च 1999 ला साहित्याच्या नभात अढळपदी जाऊन बसला. त्यांना माझा त्रिवार मानाचा मुजरा.

कुसुमाग्रज म्हणजे...  एकच ध्रुव तारा अढळ नभी  लाख तारका जरी चमचमती लाख दिव्यांची झगमग माळा एक अखंड तेजोमय साहित्याची पणती...   

Web Title: Sunetra Vijay Joshi article

टॅग्स

संबंधित बातम्या

pathak
राज्यातील शेतकऱ्यांच्या रोहित्रासाठी 5 हजार कोटीची तरतुद : विश्वास पाठक

परभणी : गेल्या 4 वर्षात ऊर्जा विभागातर्फे राज्यात 11 हजार कोटींची कामे पुर्ण करण्यात आली आहेत. तसेच उच्चदाब वितरण प्रणाली योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी...

trupti desai
तृप्ती देसाईंना कोची विमानतळावरच रोखले

कोची : येथील शबरीमल मंदिराला भेट देण्यासाठी पुण्याहून निघालेल्या सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई आणि त्यांच्या सहकारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास...

Shivajirao-Adhalrao
बिबटे पकडण्याचा ‘जुन्नर पॅटर्न’ स्वीकारा

शिक्रापूर - ‘‘एकाही बिबट्याला जखमी वा दुखापत न करता एका वर्षात १०८ बिबटे जेरबंद केलेल्या बिबट्या पकडण्याच्या ‘जुन्नर पॅटर्न’ला आता तरी स्वीकारा,’’...

भरत नाट्य मंदिर - निवृत्त लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांना सामाजिक कृतज्ञता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या वेळी (डावीकडून) डॉ. मिलिंद भोई, शीला निंभोरकर, निंभोरकर, भूषण गोखले आणि चारुदत्त आफळे.
युवकांना देशासाठी प्रेरित करावे - गोखले

पुणे - युवकांना देशासाठी प्रेरित करावे लागेल. तसेच त्यांच्यात भारताचा इतिहास जागृत ठेवण्याचे कार्य करावे लागेल, असे मत निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले...

Road-Work
कार्तिकी वारीचा मार्ग सुकर

पिंपरी - आळंदी बाह्यवळण चऱ्होली बुद्रुक-दाभाडे वस्तीतील ४५ मीटर रस्त्याचे काम प्रगतिपथावर आहे. त्यामुळे यंदाच्या कार्तिकी वारीत वाहनचालकांना पर्यायी...

Tiger
अबब! बछड्यांचा आकार ढाण्या वाघाएवढा

मुंबई - अवनी वाघिणीचे बछडेही तिच्याप्रमाणेच धष्टपुष्ट असल्याने वन विभागाचे धाबे दणाणले आहे. वयोमानानुसार आकाराने मोठे असलेले बछडे वन विभागाने...