Sections

वेल ओरबाडू नका, भक्कम आधार व्हा...

सुनेत्रा विजय जोशी  |   बुधवार, 2 मे 2018

इच्छेविरुद्ध ताकदीचा दुरुपयोग केल्याने दुष्ट प्रवृतीचा विनाश करावा लागतोच. प्रत्येक काळात आणि युगात स्त्रियांचा सन्मान करावा, हेच मनावर बिंबवण्याचा प्रयत्न होता. निसर्गाने बाईला मुळातच नाजुक घडवले आहे. जसा वृक्ष वेलीला आधार देतो. आपल्या खोडाफांद्यावर तिला बहरू देतो. तसेच सुंदर नाते स्त्री आणि पुरुष यांचे का नसावे? 

आजकाल कुठलाही पेपर वाचायला घ्या किंवा कुठलेही चॅनेल लावा हमखास एखादी बातमी तरी छेडछाड बलात्कार अत्याचार अशी असतेच. खरच कुठून आली ही विकृती? पुर्वी पण समाजात स्त्री पुरुष एकत्र वावरतच होते की. पण अशा बातम्या अगदी अभावानेच कानावर पडायच्या. कदाचित तेव्हा पण हे प्रकार असतील पण बदनामी होईल म्हणुन कदाचित स्त्रिया सांगत नसतील. किंवा तेव्हाचे पुरुष स्त्रियांना मान देत असतील. शिवाजी महाराजांचा आदर्श परस्त्री मातेसमान मानणारे.  बरे यात तरूण स्त्री किंवा सुंदर स्त्री किंवा कमी कपड्यात असलेली अशाच असतात असे नाही. तर रस्त्यावर फिरणारी वेडसर स्त्री, म्हातारी पण आहे अन गोंडस दोन वर्षांची पण आहे. तसेच काळ वेळ स्थळ कशाचेही बंधन नाही. अगदी नात्याचे सुद्धा. 

अर्थात यावरून सगळे पुरुष वाईट असे मुळीच नाही. वाचवणारे पण असतातच की. रामायणातले  एक अतिशय छान उदाहरण. रावणाने सीतेला पळवुन नेले हे खरे पण तिच्या मर्जी विरुद्ध त्याने तिच्या नखालाही स्पर्श केला नाही. हा खरा पुरुष. अर्थात तरी बळजबरीने पळवून नेले म्हणुन रामाने युद्ध करुन रावणाला मारून शिक्षा केलीच. तसेच दुसरे एक उदाहरण म्हणजे महाभारतातील. द्रौपदी दुर्योधनाच्या भावाची पत्नी म्हणजे वहिनी असुन त्याने तिच्या वस्त्राला हात घातला. पण इथे मदतीला दुसरा पुरुष म्हणजे श्रीकृष्ण आलाच. शिवाय युद्ध करुन अर्जुनाने दुर्योधनाला संपवलेच. 

इच्छेविरुद्ध ताकदीचा दुरुपयोग केल्याने दुष्ट प्रवृतीचा विनाश करावा लागतोच. प्रत्येक काळात आणि युगात स्त्रियांचा सन्मान करावा, हेच मनावर बिंबवण्याचा प्रयत्न होता. निसर्गाने बाईला मुळातच नाजुक घडवले आहे. जसा वृक्ष वेलीला आधार देतो. आपल्या खोडाफांद्यावर तिला बहरू देतो. तसेच सुंदर नाते स्त्री आणि पुरुष यांचे का नसावे? 

मुख्य म्हणजे यात घरातल्या माणसांच्या भूमिका खुप महत्वाच्या आहेत. आपल्या कुटुंबातील कुणा व्यक्तीने जर असे दुष्कर्म केले असेल, तर त्याला घरात जागा नसावी. आई, बायको, मुलगी सगळ्या एक होऊन हे करू शकतात. कारण या सगळ्या नात्यांच्या आधी त्या एक स्त्री आहेत. हे त्यांनी विसरून चालणार नाही. तसेच कुणा वकीलानेही त्यांचे वकीलपत्र घेऊ नये. समाजातील लोकांनी त्याच्याशी संबंध ठेवु नये. ही शिक्षा मरणाहुन भयंकर वाटेल. त्याला शेवटी एकट्याने जगणे इतके सोपे नसते. नोकरीतून काढुन टाकावे. एकाला जरी अशी शिक्षा झाली तर दुसरा नक्कीच विचार करेल. 

हा विचार मनात आला म्हणजे, लहानपणी एक गोष्ट ऐकली होती की एक अट्टल दरोडेखोर जेव्हा पकडल्या जातो तेव्हा त्याला फाशीची शिक्षा सुनावली जाते. तो म्हणतो मला माझ्या आईशी शेवटच बोलायचे आहे. व तो आईच्या जवळ तिच्या कानात बोलण्यासाठी जातो तेव्हा तिच्या कानाला कडकडून चावतो. असे का केले अस त्याला विचारल्यावर तो म्हणतो जर आईने मला पहिली चोरी केली तेव्हाच शिक्षा केली असती तर कदाचित मी पुढच्या वेळी चोरी करण्याचे धाडस नसते केले. 

अर्थात काही वाईट करणे जसे गुन्हा आहे तसेच ते लपवुन पाठिशी घालणेही गुन्हाच आहे. म्हणुन घरच्यांनी वेळेत काही बदल लक्षात आलेच तर कडक सुनावले पाहिजे. याचा अर्थ घरचे त्याला चांगले संस्कार देत नाही असे नाही. पण आमचा मुलगा असे काही करणारच नाही म्हणुन शहानिशा न करता पाठिशी घालतात. नियमाला अपवाद असतातच. कुठल्याही आईवडिलांना आपल्या मुलाने असे वाईट कृती करावी, असे वाटत नाही. 

जो पुरुष आई बहीण व मुलीच्या नजरेतुन उतरेल तो जगणार तर नाहीच. आपल्या मरणाने मरेल. कुणी म्हणतात आजकाल मुली तोकडे कपडे घालतात. अंगप्रदर्शन करतात वगैरे. पण पूर्ण झाकलेलेल्या कपड्यातल्या मुलींना पण बळी पडायला लागलेच आहे. इतर पुरुष का चाळनल्या जात नाहीत. 

खरे तर धर्माने आपल्याला शरीरसुखासाठी लग्नाचा राजमार्ग दिलेला आहे. मग परस्त्री कडे वाकड्या नजरेने बघण्याचा प्रश्न येतो कुठे. मुळात बाई ही उपभोगाचे साधन आहे हा समजच बदलायला हवा. अन या साठी घरातुन मुलांना तसे सांगण्यात यावे. बायकांवरचे अश्लील जोक्स बंद व्हायला हवे. अर्थात काही बायका देखिल याला कारणीभूत आहेत. नाही असे नाही. 

दोघांच्या संमतीने असलेल्या संबंधांबद्दल समाज काही म्हणत नाही तरीही अनैतिक संबंध असेच म्हणतात त्याला. पण जबरदस्ती मात्र नसावीच. त्यासाठी कठोर कारवाई देखिल त्वरित हवी. तसा हा विषय खुप मोठा आहे. अजुन बरेच मुद्दे आहेत. स्त्रियांनीही नको तिथे धाडस दाखवण्याची गरज नाही. त्यामुळे स्वतःला जपायला हवे. अन पुरुषांनी तिचे रक्षण करून मर्दुमकी दाखवायाला हवी. त्यातच खरा पुरुषार्थ आहे.  स्त्रियांचे रक्षण करुन तिच्या नजरेत मानाचे स्थान मिळवायला हवे. 

Web Title: Esakal Citizen Journalism Sunetra Vijay Joshi article

टॅग्स

संबंधित बातम्या

dr ashok modak
शेजारधर्म अन्‌ धर्मसंकट

चीनच्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्‍वभूमीवर शेजारी देशांबरोबरील संबंध हा भारताच्या परराष्ट्र धोरणासमोरील कळीचा मुद्दा आहे. त्यातच इन्डो-पॅसिफिक...

Shocking Rakhi Sawant Wants To Donate Her Boobs To The Society In This Viral Video
राखी सावंत करणार 'तो' अवयव दान

मुंबई- आपल्या मृत्यूनंतर कोणी ना कोणी कुठला ना कुठला तरी अवयव दान करत असतो. परंतु, आयटम गर्ल म्हणून बॉलिवूडमध्ये प्रकाशझोतात आलेली राखी सावंत सध्या...

girl
चिमुकलीवर अत्याचार करून घेतला नाकाचा चावा

औंध (पुणे) : तीन वर्षीय चिरमुडीवर लैंगिक अत्याचार करून व तिच्या नाकाचा चावा घेऊन जखमी केल्याची धक्कादायक घटना शनिवारी पाषाण येथे घडली. याप्रकरणी...

अर्थमंत्री जेटलींची उद्या बॅंकांच्या प्रमुखांबरोबर बैठक

नवी दिल्ली :केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली उद्या (मंगळवार) सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांच्या प्रमुखांची बैठक घेणार आहेत. या बैठकीत बॅंकांच्या वार्षिक...

Pregnant Delhi Woman Bites Off Husbands Tongue Allegedly Over His Looks
...म्हणून नवऱयाची किस करताना तोडली जीभ

नवी दिल्ली- आपला नवरा हा दिसायला सावळा आहे. तो चांगला दिसत नसल्याच्या कारणावरुन किस करताना पतीच्या जीभेचा लचका तोडल्याचा धक्कादायक प्रकार दिल्लीतील...