Sections

सोनवडे घाटाचे काम होणार केव्हा... 

प्रा. महेंद्र नाटेकर |   गुरुवार, 15 मार्च 2018

कोल्हापूरला जाण्यासाठी आम्हा सिंधुदुर्गवासियांसाठी दोन प्रमुख मार्ग आहेत. एक म्हणजे फोडा घाट आणि करूळ घाट. पावसाळ्यात या दोन्ही घाटात दरडी कोसळतात त्यामुळे हे दोन्ही घाटमार्ग बंद होतात. करूळ घाट अवघड असल्याने अपघाताचेही प्रकार वारंवार घडत असतात. या दोन्ही मार्गावरील ताण कमी करायचा असेल तर घोटगे-सोनवडे या घाटमार्गास प्राधान्य देण्याची गरज आहे.

कोल्हापूरला जाण्यासाठी आम्हा सिंधुदुर्गवासियांसाठी दोन प्रमुख मार्ग आहेत. एक म्हणजे फोडा घाट आणि करूळ घाट. पावसाळ्यात या दोन्ही घाटात दरडी कोसळतात त्यामुळे हे दोन्ही घाटमार्ग बंद होतात. करूळ घाट अवघड असल्याने अपघाताचेही प्रकार वारंवार घडत असतात. या दोन्ही मार्गावरील ताण कमी करायचा असेल तर घोटगे-सोनवडे या घाटमार्गास प्राधान्य देण्याची गरज आहे.

या मार्गाने इतर मार्गाच्या तुलनेत कोल्हापूरचे अंतर सुमारे वीस किलोमीटरने कमी होते. तसेच या मार्गाने फारशी उंचीही नाही. वळणेही कमी येतात. यासाठी घोटगे-सोनवडे घाटमार्ग सुचविण्यात आला होता. शासनाने या घाटमार्गाला 1970 च्या दशकात मंजुरी दिली आहे. वेंगुर्ला, मठ, पणदूर, घोटगे, सोनवडे व शिवडाव- कडगाव- गारगोटी अशा महामार्ग मंजूर केल्याचे जाहीर केले होते. 

सोनवडे घाटमार्ग होणार म्हणून सिंधुदुर्ग व कोल्हापूर वासियांना आनंदही झाला होता. परंतु पुढे हे काम रखडले. या मार्गासाठी अनेक आंदोलने झाली. रास्ता रोको, घेरावही घालण्यात आले. टप्प्याटप्प्याने या मार्गावर येणाऱ्या वनजमिनी व वनसंज्ञा जमिनीला पर्यायी जमिनीही देण्यात आल्या. स्थानिक ग्रामस्थांनी यास उत्स्फुर्त प्रतिसादही दिला.

घाटमार्गाच्या दोन्ही बाजूंनी दोन-दोन किलोमीटरचे रस्तेही तयार झाले. वन प्राणी सर्व्हेक्षण व जन सुनावणीही या मार्गासाठी झाले. कोणीही तक्रार न करता या घाटमार्गासाठी सर्वांनी सहकार्य केले. डेहराडूनने पर्यावरणासाठी हिरवा कंदीलही दिला. इतकेच काय घाटमार्गासाठी आवश्‍यक असलेला निधीही मंजूर करण्यात आला. घाटमार्गातील सर्व अडथळे दूर झाले आहेत तर मग या मार्गाचे काम केव्हा पूर्ण होणार ? गेली चाळीस वर्षे घाटमार्गाची प्रतिक्षा करून आता जनता निराश झाली आहे.  (लेखक सोनवडे घाटमार्ग संघर्ष समितीचे अध्यक्ष आहेत) 

Web Title: Esakal Citizen Journalism Mahendra Natekar article on Sonawade Ghat

टॅग्स

संबंधित बातम्या

akola
श्री समर्थ पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांचा पर्यावरणपूरक गणेशोत्सव

अकोला : जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या ‘स्वच्छ मोर्णा’ मिशनची आठवण ठेवीत श्री समर्थ पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांन्यांनी आपला गणेशोत्सव ‘बाप्पा...

...तर देशमुख यांच्या घरासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन, स्वाभिमानीचा ईशारा

आटपाडी  -  माणगंगा सहकारी साखर कारखान्याने गेल्या दोन हंगामातील ऊस बिले अद्याप दिलेली नाहीत. ती द्यावीत या  मागणीसाठी सोमवार (ता.24)...

images.jpg
अष्टांग योगाची आठ अंगे आणि त्यांचे महत्व

योग म्हणजे मन, शरीर आणि आत्म्याचे एकत्रीकरण. योगाचे अधिकाधिक लाभ मिळवण्यासाठी तसेच यात संपूर्ण प्राण्य मिळवण्यासाठी त्याचा पाया समजून घेणे अत्यावश्यक...

accident
औरंगाबाद: ट्रक-मोटारसायकलीच्या धडकेत दुचाकीस्वार ठार 

गल्लेबोरगाव : औरंगाबाद-कन्नड महामार्गावर आलापूर फाटा (ता. खुलताबाद) येथे शुक्रवारी (ता. २१) रात्री उशीरा कन्नडहून औरंगाबादकडे येणारा ट्रक (एमएच...

Mahadevrao Mahadik
...तर कोल्हापूर दक्षिणमधून निवडणूक लढविणार : महाडिक

कोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघातून 2019 च्या निवडणुकीसाठी आमदार अमल महाडिक यांना मी अजून विचारलयं कुठे? जर ते तयार नसतील तर मी...