Sections

सेबीचा महत्त्वाचा निर्णय: उशिरापर्यंत शेअर बाजारात खरेदी-विक्री करता येणार

वृत्तसंस्था |   शुक्रवार, 4 मे 2018

मुंबई: भारतीय भांडवल बाजार नियामक सेबीने इक्विटी डेरिव्हेटिव्हज सेगमेंटमध्ये व्यवहाराचा कालावधी (ट्रेडिंग) वाढवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. इक्विटी डेरिव्हेटिव्हज सेगमेंटमध्ये आता रात्री 11.55 वाजेपर्यंत व्यवहार करता येणार आहे. नवीन बदल 1 ऑक्टोबर 2018 पासून लागू करण्यात येणार आहे. सध्या शेअर बाजारात शेअर खरेदी-विक्रीचे व्यवहार सकाळी 9:00 पासून दुपारी 3.30 वाजेपर्यंत सुरु असतात. 

मुंबई: भारतीय भांडवल बाजार नियामक सेबीने इक्विटी डेरिव्हेटिव्हज सेगमेंटमध्ये व्यवहाराचा कालावधी (ट्रेडिंग) वाढवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. इक्विटी डेरिव्हेटिव्हज सेगमेंटमध्ये आता रात्री 11.55 वाजेपर्यंत व्यवहार करता येणार आहे. नवीन बदल 1 ऑक्टोबर 2018 पासून लागू करण्यात येणार आहे. सध्या शेअर बाजारात शेअर खरेदी-विक्रीचे व्यवहार सकाळी 9:00 पासून दुपारी 3.30 वाजेपर्यंत सुरु असतात. 

स्टॉक एक्सचेंजला इक्विटी डेरिव्हेटिव्हज सेगमेंटमध्ये सकाळी 9:00 वाजेपासून रात्री 11:55 वाजेपर्यंत ट्रेडिंग सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. कमॉडिटी डेरिव्हेटिव्ह सेगमेंटप्रमाणे आता इक्विटी डेरिव्हेटिव्हजमधील व्यवहार उशिरापर्यंत सुरु राहतील. कमॉडिटी डेरिव्हेटिव्ह सेगमेंटमध्ये  सकाळी 10:00 ते रात्री 11:55 दरम्यान व्यवहार सुरु असतात. 

स्टॉक एक्स्चेंजने ट्रेडिंग कालावधी वाढवल्यास सेबीची परवानगी घेताना एक्स्चेंजकडील जोखीम व्यवस्थापन प्रणाली, सेटलमेंटची प्रक्रिया, मनुष्यबळाची उपलब्धता याबाबत सविस्तर माहिती द्यावी लागणार आहे. 

Web Title: SEBI allows exchanges to extend equity deriatives timing to 11:55 pm

टॅग्स

संबंधित बातम्या

'विप्रो'चा नफा 2,510 कोटींवर; बोनस शेअरची घोषणा 

मुंबई: भारतातील तिसऱ्या क्रमांकाची आयटी कंपनी 'विप्रो'चा नफा सरलेल्या तिसऱ्या तिमाहीत 30 टक्क्यांनी वाढत 2,510.4 कोटी रुपयांवर पोचला आहे. गेल्यावर्षी...

कसोटीतनंतर वनडेतही भारत अजिंक्य; 2-1 ने मालिका जिंकली

मेलबर्न : भारताचं 'रन मशिन' विराट कोहली एखाद्या सामन्यात फार खेळला नाही, तरीही भारतीय संघाची ऑस्ट्रेलियातील विजयी मालिका मात्र कायमच राहिली....

अन् धोनी-भुवीने असे अडकवले फिंचला जाळ्यात (व्हिडिओ)

मेलबर्न : मैदानावर डावपेच आखण्यामध्ये महेंद्रसिंह धोनीसारखा तरबेज खेळाडू सध्याच्या क्रिकेटविश्‍वात दुसरा नसावा.. सामन्यातील परिस्थिती, फलंदाजाची...

 मुकेश अंबानींची मोदींना विनंती; भारतीय डेटा भारतीयांच्याच ताब्यात राहावा!

अंबानींना आली महात्मा गांधीजींची आठवण  मुंबई:रिलायन्स समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना माहितीच्या नियंत्रणासंदर्भात...

bhilar
पुस्तकांच्या गावात बालकुमार साहित्य संमेलनाचा प्रारंभ

भिलार - ज्यांनी स्त्रियांसाठी शिक्षणाची दारे खुली अशा सावीत्रीबाई फुले यांचा वेश परिधान केलेल्या शाळकरी मुलीच्या हस्ते पालखीतील ग्रंथांची पुजा करून...

आता देशाच्या सीमांवर इस्त्रोची नजर

नवी दिल्ली: पाकिस्तानी सीमेवरुन होणारी दहशतवाद्यांची घुसखोरी भारतीय लष्करासाठी कायम डोकेदुखी ठरते. सीमेपलीकडून होणारी घुसखोरी रोखण्यासाठी भारतीय जवान...