Sections

'शिर्डी का चमत्कार' गोयलांच्या संपत्तीत 3 हजार पटींनी वाढ: राहुल

पीटीआय |   बुधवार, 11 एप्रिल 2018

केंद्र सरकारचे रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी स्वतःच्या मालकीच्या कंपन्यांना फायदा पोचवला असून गोयल कुटुंबीयांची मालकी असलेल्या कंपनीच्या नफ्यात तीन हजार पटींनी वाढ झाल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

नवी दिल्ली: केंद्र सरकारचे रेल्वेमंत्री पियूष गोयल यांच्या समोरील अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. गोयल यांनी स्वतःच्या मालकीच्या कंपन्यांना फायदा पोचवला असून गोयल कुटुंबीयांची मालकी असलेल्या कंपनीच्या नफ्यात तीन हजार पटींनी वाढ झाल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे गोयल यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी केली. 

काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा यांनी पत्रकार परिषदेत  पियूष गोयल यांच्यावर गंभीर आरोप केले. गोयल यांच्या पत्नी सीमा गोयल यांची मालकी असलेल्या इंटरकॉन एडव्हायजर्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी २००५- ०६ मध्ये फक्त १ लाख रुपयांची गुंतवणूक करुन सुरु करण्यात आली. आता दहा वर्षांनी मात्र कंपनीचा नफा ३० कोटी रुपयांवर पोचला असल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात आले. 

मित्रों....

"शिरडी के चमत्कारों" की तो कोई "सीमा" ही नहीं है| #PiyushGhotalaReturns

https://t.co/YQETlHSjXy

— Rahul Gandhi (@RahulGandhi) April 11, 2018

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी "शिरडी के चमत्कारों" की तो कोई "सीमा" ही नहीं है| '' असे ट्विट करत पियूष गोयल यांच्यावर टीका केली आहे. याशिवाय शिर्डी इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीच्या राकेश अग्रवाल आणि मुकेश बन्सल यांच्याशी देखील पियूष गोयल यांची जवळीक असून या दोघांनी बँकेचे ६५० कोटी रुपये थकवले असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे.  मोदी सरकारकडून पारदर्शक सरकारचा दावा केला जातो आता मात्र त्यांचे सर्व दावे खोटे आणि दिखाव्यासाठी असून आता पोलखोल होत आहे, असेही काँग्रेसकडून सांगण्यात आले. 

 

Web Title: Rahul Gandhi targets Piyush Goyal for 'Shirdi ka Chamatkar'

टॅग्स

संबंधित बातम्या

Your Grandfather Grandmother was with the British says Kapil Sibal
मोदीजी, तुमचे 'आजी-आजोबा' ब्रिटिशांसोबत होते : सिब्बल

नवी दिल्ली : तुमच्या आजी-आजोबांनी छत्तीसगडमध्ये पाण्याची पाईपलाईन टाकली होती का? असे मोदीजी राहुल गांधींना विचारतात. मात्र, नेहरूजींनी आधुनिक...

बाळासाहेबांचे ते शेवटचे शब्द...

बाळ केशव ठाकरे ऊर्फ बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म 23 जानेवारी 1926 ला पुण्यात झाला. त्यांनी महाराष्ट्रात शिवसेना या पक्षाची स्थापना केली. पुढे त्यानी...

पुणेकरांना तत्पर वाहतूक सेवा देणार

कोथरूड - पुण्यातील वाहतूक कोंडी कायमस्वरूपी सोडविण्यासाठी मेट्रो हाच उपाय असून, त्याच उद्देशाने हा प्रकल्प वेळेत पूर्ण करून पुणेकरांना तत्पर वाहतूक...

Sandeep Shetty
माफ करा; मी आत्ताच खून करून आलोय...

बंगळूरुः सर मला माफ करा, मी आत्ताच मित्राचा खून करून आलो असून, आत्मसमर्पन करण्यासाठी पोलिस ठाण्यातच चाललो आहे, अशी कबुली एका युवकाने वाहतूक पोलिसाला...

पैठण, जि. औरंगाबाद - पैठण मेगा फूड पार्कचे उद्‌घाटन केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योगमंत्री हरसिमरत कौर बादल यांच्या हस्ते गुरुवारी (ता.१५) झाले. या वेळी सुभाष देसाई, नंदकिशोर कागलीवाल, रावसाहेब दानवे, चंद्रकांत खैरे, संदीपान भुमरे, अतुल सावे, प्रकाश सारवाल,
अन्न प्रक्रिया प्रकल्पांसाठी महाराष्ट्राkला २५०० कोटी

औरंगाबाद - शेती उत्पादनात आघाडीवर असलेल्या आपल्या देशात पायाभूत सुविधांअभावी अन्नधान्याची नासाडीही मोठ्या प्रमाणात होते आहे. ही नासाडी...

pathak
राज्यातील शेतकऱ्यांच्या रोहित्रासाठी 5 हजार कोटीची तरतुद : विश्वास पाठक

परभणी : गेल्या 4 वर्षात ऊर्जा विभागातर्फे राज्यात 11 हजार कोटींची कामे पुर्ण करण्यात आली आहेत. तसेच उच्चदाब वितरण प्रणाली योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी...