Sections

बॅंकांचे प्रमुख आता चौकशीच्या फेऱ्यात

पीटीआय |   बुधवार, 7 मार्च 2018
pnb-fraud

मुंबई - पंजाब नॅशनल बॅंकेतील (पीएनबी) १२ हजार ७०० कोटी रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी गंभीर गैरव्यवहार तपास विभागाने (एसएफआयओ) ३१ बॅंकांच्या प्रमुखांना चौकशीसाठी पाचारण केले आहे. यामध्ये आयसीआयसीआय बॅंकेच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर आणि ॲक्‍सिस बॅंकेच्या प्रमुख शिखा शर्मा यांचा समावेश आहे. 

मुंबई - पंजाब नॅशनल बॅंकेतील (पीएनबी) १२ हजार ७०० कोटी रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी गंभीर गैरव्यवहार तपास विभागाने (एसएफआयओ) ३१ बॅंकांच्या प्रमुखांना चौकशीसाठी पाचारण केले आहे. यामध्ये आयसीआयसीआय बॅंकेच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर आणि ॲक्‍सिस बॅंकेच्या प्रमुख शिखा शर्मा यांचा समावेश आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अब्जाधीश हिरे व्यापारी नीरव मोदी आणि मेहुल चोक्‍सी यांच्या कंपन्यांशी आर्थिक देवाणघेवाण करणाऱ्या ३१ बॅंकांच्या प्रमुखांना ‘एसएफआयओ’ने चौकशीसाठी मुंबईतील कार्यालयात पाचारण केले आहे. यामध्ये आयसीआयसीआयच्या प्रमुख चंदा कोचर आणि ॲक्‍सिस बॅंकेच्या प्रमुख शिखा शर्मा यांचा समावेश आहे. एखाद्या गैरव्यवहारानंतर बॅंकांच्या प्रमुखांना अशा प्रकारची चौकशीसाठीची पत्रे पाठविण्यात येतात. हा नेहमीच्याच तपास प्रक्रियेचा भाग आहे. 

श्रीनिवासन यांची उपस्थिती  ॲक्‍सिस बॅंकेचे उपव्यवस्थापकीय संचालक व्ही. श्रीनिवासन ‘एसएफआयओ’च्या कार्यालयातून आज दुपारी बाहेर पडताना दिसले. याविषयी सूत्रांनी सांगितले, की संबंधित अधिकारी बॅंकेच्या कर्ज विभागाची जबाबदारी सांभाळणारे असून, सर्व खात्यांची माहिती असल्याने ते तपासात मदत करीत आहेत. 

शेअर बाजाराने खुलासा मागविला  ‘एसएफआयओ’ने आयसीआयसीआय बॅंक आणि ॲक्‍सिस बॅंकेच्या प्रमुखांना चौकशीसाठी बोलाविल्याने याबाबत दोन्ही बॅंकांकडून मुंबई शेअर बाजाराने खुलासा मागविला आहे. ‘पीएनबी’तील गैरव्यवहाराचा तपास केंद्रीय अन्वेषण (सीबीआय) विभागासह अर्थ मंत्रालयाच्या अखत्यारीतील सक्तवसुली संचलनालय (ईडी) ही केंद्रीय तपास यंत्रणा करीत आहे.

Web Title: marathi news bank PNB SFIO

टॅग्स

संबंधित बातम्या

प्लास्टिकबंदी झुगारली!

नवी मुंबई - प्लास्टिकबंदीच्या निर्णयामुळे सुखावलेल्या पर्यावरणप्रेमींना नवी मुंबईत धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. मासळी बाजार, मंडयांसह छोट्या-...

ठाण्यात डीजेचा आवाज वाढलेलाच!

ठाणे - उच्च न्यायालयाने डीजे आणि लाऊड स्पीकरच्या वापरावर विसर्जन मिरवणुकीत बंदी कायम ठेवली असतानाही ठाण्यात काही ठिकाणी डीजेचा वापर करून उच्च...

Abdulla Yameen concedes defeat in Maldives presidential election
मालदिवचे विद्यमान अध्यक्ष पराभूत

कोलंबो- मालदिवमध्ये झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये विद्यमान अध्यक्ष अब्दुल्ला यामीन यांना पराभूत करत विरोधीपक्षांचे उमेदवार इब्राहिम महंमद...

धुलाईअभावी शस्त्रक्रिया रखडल्या

मुंबई - सेंट्रल लाँड्रीमध्ये पुरेसे कर्मचारी नसल्याने पालिकेच्या रुग्णालयांमध्ये रुग्णांसाठी वापरले जाणारे कपडे वेळेत धुतले जात नाहीत. त्यामुळे सायन...

‘तोंडी तलाक अध्यादेशामुळे मुस्लिम पुरुषांवर अन्याय’

मुंबई - मुस्लिम महिलांना दिलासा देणाऱ्या तोंडी तलाकच्या अध्यादेशाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. या...