Sections

"बिटकॉइन'चा नवा नीचांक!

वृत्तसंस्था |   शनिवार, 31 मार्च 2018

मध्यंतरी "रॅन्समवेअर'मुळे चर्चेत आलेल्या बिटकॉइन या व्हर्च्युअल करन्सीने 7 फेब्रुवारीनंतर नवीन नीचांक केला आहे. जागतिक बाजारात एका बिटकॉइनचे मूल्य 6,800 अमेरिकी डॉलरवर पोचले आहे.

मुंबई: मध्यंतरी "रॅन्समवेअर'मुळे चर्चेत आलेल्या बिटकॉइन या व्हर्च्युअल करन्सीने 7 फेब्रुवारीनंतर नवीन नीचांक केला आहे. जागतिक बाजारात एका बिटकॉइनचे मूल्य 6,800 अमेरिकी डॉलरवर पोचले आहे. म्हणजेच भारतीय रुपयात सध्या एका बिटकॉइनचे मूल्य सुमारे 4 लाख 42 हजार रुपये आहे. 

आशियाई देशांमध्ये व्हर्च्युअल करन्सीवर लागू करण्यात आलेले नवीन नियम आणि जपानमध्ये व्हर्च्युअल करन्सीचे असलेले मिस्टर एक्सचेंज आणि टोकिओ गेटवे चौकशीसाठी चालू आठवड्यात बंद करण्यात आले. त्यामुळे बिटकॉइन पुन्हा एकादा 6,800 अमेरिकी डॉलरवर पोचला. शिवाय बिटकॉइनप्रमाणेच व्हर्च्युअल करन्सी असलेल्या रिप्पल आणि इथेरिअमच्या मूल्यात देखील घट झाली आहे. तज्ज्ञांनी यापूर्वीच व्हर्च्युअल करन्सीच्या मूल्यवाढीचा हा फुगा असून, तो कधीही फुटण्याची शक्‍यता असल्याचे मत व्यक्त केले होते. विशेष म्हणजे, सात वर्षांपूर्वी एका बिटकॉइनचे मूल्य फक्त 8 रुपये म्हणजेच 0.003 डॉलर इतके होते. 

गेल्या काही दिवसांत आभासी चलनाच्या मूल्यात वेगाने वाढ झाली आहे. काही महिन्यांपूर्वी एका बिटकॉइनचे मूल्य 15 हजार अमेरिकी डॉलरच्या पुढे गेल्याने तमाम अर्थविश्‍वाचे डोळे विस्फारले गेले होते. मागणी आणि पुरवठा तत्वावर मूल्य ठरणाऱ्या या चलनातील ही वाढ म्हणजे एकप्रकारे फुगा असून, तो जोरात फुटूही शकतो, अशी भीती काहींनी त्यावेळी व्यक्त केली होती. 

जगातील काही देशांमध्ये बिटकॉइनला कायदेशीर मान्यता देण्यात आली आहे. विशेषत: जर्मनी आणि जपानने या चलनाला कायदेशीर मान्यता दिल्यानंतर त्याच्या मूल्यात मोठी वृद्धी झाली आहे. भारतात मात्र बिटकॉइनला कोणत्याही प्रकारची कायदेशीर मान्यता देण्यात आलेली नाही. त्याचमुळे अर्थ मंत्रालयानेदेखील सर्वसामान्य गुंतवणूकदारांना याबाबत सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. कारण रिझर्व्ह बॅंकेसारख्या कोणत्याही मध्यवर्ती बॅंकेचे या चलनावर आणि त्याच्या व्यवहारांवर नियंत्रण वा नियमन नाही. 

सध्या जगभरासह भारतात देखील बिटकॉइनच्या साह्याने व्यवहार सुरू झाले आहेत. त्यामुळे बिटकॉइन हा एक गुंतवणुकीचा पर्याय होऊ शकतो का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. केंद्र सरकारने बिटकॉइनच्या संदर्भात जनतेकडून आपली मते मागवली होती.  

Web Title: Bitcoin Prices Tumble Below 7000 dollar

टॅग्स

संबंधित बातम्या

Lehman
‘लेहमन’बुडीची दशकपूर्ती (ऋषिराज तायडे)

२००८ च्या जागतिक मंदीला या आठवड्यात दहा वर्ष पूर्ण होत आहेत. त्याला कारणीभूत ठरलेल्या महत्त्वाच्या कारणांपैकी एक म्हणजे लेहमन ब्रदर्स या महाकाय...

Rahul Gandhi
मोदी-अंबानींचा भारताविरुद्धच 'सर्जिकल स्ट्राईक' : राहुल गांधी

नवी दिल्ली : वादग्रस्त राफेल करारावरून काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर आज (शनिवार) जोरदार हल्ला केला. 'पंतप्रधान नरेंद्र...

rafale deal
सरकारकडूनच रिलायन्सची शिफारस; फ्रान्सच्या माजी अध्यक्षांचा खुलासा

नवी दिल्ली, ता. 21 ः राफेल विमाननिर्मिती करणारी कंपनी "डसॉस्ट'ने "ऑफसेट' तरतुदीनुसार रिलायन्स डिफेन्स (अनिल अंबानी) या भारतीय कंपनीला भागीदार...

हिंजवडी -शिवाजीनगर मेट्रोला केंद्राची मंजुरी

पुणे -  पुणे महनगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हाती घेतलेल्या हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो प्रकल्पावर केंद्र सरकारच्या मान्यतेची...

लॉंड्री व्यावसायिकांना स्वस्त दरात वीज 

नागपूर - वीजबिलाच्या वाढीव दरामुळे मेटाकुटीस आलेल्या राज्यातील लॉंड्री व्यावसायिकांना राज्य सरकारने दिलासा दिला आहे. सरकार त्यांना औद्योगिक...