Sections

पतधाेरणामुळे वाढली शेअर बाजाराची पत

पीटीआय |   शुक्रवार, 6 एप्रिल 2018
Share-Market

मुंबई - रिझर्व्ह बॅंकेने (आरबीआय) पतधोरणात स्थिर ठेवलेले व्याजदर आणि चलनवाढीचा कमी केलेला अंदाज यामुळे शेअर बाजाराने गुरुवारी उसळी घेतली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स ५७७ अंशांची झेप घेऊन ३३ हजार ५९६ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी १९६ अंशांची वाढ होऊन १० हजार ३२५ अंशांवर बंद झाला. 

रिझर्व्ह बॅंकेने द्वैमासिक पतधोरण आढावा बैठकीत व्याजदरात कोणतेही बदल केले नाहीत. याचबरोबर किरकोळ चलनवाढीचा अंदाज कमी केला आहे. तसेच, आर्थिक विकासाचा वेग वाढण्याची शक्‍यताही व्यक्त करण्यात आली आहे.

याचा सकारात्मक परिणाम शेअर बाजारावर झाला. देशभरात सरासरीएवढा मॉन्सून पडण्याचा अंदाज स्कायमेटने व्यक्त केल्याचाही चांगला परिणाम शेअर बाजारावर झाला. यातच जागतिक पातळीवर अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापार युद्धाची भीती काही प्रमाणात कमी झाल्याने गुंतवणूकदारांमध्ये उत्साह होता.  

सेन्सेक्‍स ५७७ अंशांची झेप घेऊन ३३ हजार ५९६ अंशांवर बंद झाला. निर्देशांकात १२ मार्चनंतर झालेली ही सर्वाधिक वाढ ठरली आहे. त्या वेळी निर्देशांक ६१० अंशांनी वधारला होता. कालच्या सत्रात सेन्सेक्‍समध्ये ३१५ अंशांची घसरण झाली होती. निफ्टी आज १९६ अंशांची उसळी घेऊन १० हजार ३२५ अंशांवर बंद झाला. 

तेजीची कारणे      अमेरिका-चीन व्यापार युद्धाची भीती कमी      मॉन्सूनच्या चांगल्या अंदाजाने उत्साहाचे वातावरण      रिझर्व्ह बॅंकेच्या पतधोरणात व्याजदर स्थिर      आर्थिक विकासाचा वेग वाढण्याचा अंदाज      चलनवाढीचा वेग मंदावण्याची शक्‍यता 

सेन्सेक्‍स ३३,५९६    (+577)  निफ्टी १०,३२५    (+196) 

Web Title: arthavishwa news share market Credit cards

टॅग्स

संबंधित बातम्या

pune
शेतकरी उत्पादक संस्थेचा फायदा खऱ्या शेतकऱ्यांनाच व्हावा : केंद्रीय कृषी राज्यमंत्री

पुणे (औंध) : "बाजारात विक्री करतांना शेतकऱ्यांनी गटांच्या स्वरुपात एकत्र येऊन विक्री व पुरवठ्याचा प्रयत्न केला तर नक्कीच त्यांचे दिवस बदलतील....

WhatsApp-Image-2018-09-20-a.jpg
इंदापूरमध्ये मोहरम आणि गणेशोत्सव एकत्र साजरा

इंदापूर : येथील शास्त्री चौकातील नवजवान मित्र मंडळ तसेच शेख मोहल्ला मोहरम कमिटीच्या वतीने एकत्रित गणेशोत्सव तसेच ताबूत साजरा करण्यात आला....

Samruddhi-Highway
समृद्धी महामार्गालगत ‘हायटेक’ सुविधांची चाचपणी

औरंगाबाद - समृद्धी महामार्गालगत तयार करण्यात येत असलेल्या ‘युटिलिटी कॉरिडॉर’मधून सुविधांची चाचपणी करण्यासाठी एमएसआरडीसीने ‘रिक्वेस्ट फॉर प्रपोझल’ (...

गायकवाड साहेब; मलाही द्या गैरव्यवहाराची परवानगी ! - बर्वे 

सांगली - सामाजिक कार्यकर्ते वि. द. बर्वे यांनी आता शासकीय अधिकाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांना अर्थपूर्ण तडजोडीसाठी...

Human Trafficking girl woman sailing crime steroid
कोवळ्या कळ्यांवर ‘स्टेरॉईड’चा भडिमार !

नागपूर - ज्या वयातील मुली घरातील अंगणात खेळतात, परिसरात त्यांच्या हसण्याचा, दंगा मस्ती करण्याचा आवाज घुमतो... त्याच वयातील अनेक निराधार, अनाथ वा...