Sections

रिपब्लिकन पक्षाचे अधिकृत उमेदवार डोनाल्ड ट्रम्प

पीटीआय |   बुधवार, 20 जुलै 2016
asd

क्‍लिव्हलॅंड - अमेरिकेमधील अध्यक्षीय निवडणुकीसाठी गेल्या काही महिन्यांपासून आक्रमक प्रचार करत असलेले रिपब्लिकन नेते डोनाल्ड ट्रम्प हे या पक्षाचे अधिकृत उमेदवार झाल्याची घोषणा आज (बुधवार) करण्यात आली. रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनास नुकतीच सुरुवात झाली आहे. ट्रम्प यांच्या उमेदवारीसंदर्भात पक्षामधील मतभेद उघड झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर रिपब्लिकन नेते व येथील लोकप्रतिनिधीगृहाचे अध्यक्ष पॉल रायन यांनी ट्रम्प यांना पक्षकडून ठाम पाठिंबा मिळावा, अशी अपेक्षा नुकतीच व्यक्त केली होती. 

क्‍लिव्हलॅंड - अमेरिकेमधील अध्यक्षीय निवडणुकीसाठी गेल्या काही महिन्यांपासून आक्रमक प्रचार करत असलेले रिपब्लिकन नेते डोनाल्ड ट्रम्प हे या पक्षाचे अधिकृत उमेदवार झाल्याची घोषणा आज (बुधवार) करण्यात आली. रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनास नुकतीच सुरुवात झाली आहे. ट्रम्प यांच्या उमेदवारीसंदर्भात पक्षामधील मतभेद उघड झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर रिपब्लिकन नेते व येथील लोकप्रतिनिधीगृहाचे अध्यक्ष पॉल रायन यांनी ट्रम्प यांना पक्षकडून ठाम पाठिंबा मिळावा, अशी अपेक्षा नुकतीच व्यक्त केली होती. 

अमेरिकेमधील अध्यक्षीय निवडणुकीसाठी रिपब्लिकन पक्षातर्फे उमेदवारी मिळणे हा आपला बहुमान असल्याची भावना ट्रम्प यांनी व्यक्त केली. "मी कष्ट करेन आणि तुम्हाला निराश करणार नाही,‘ असे आश्‍वासन ट्रम्प यांनी घोषणेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना दिले. ट्रम्प हे अध्यक्षीय उमेदवारीचा यासंदर्भातील औपचारिक प्रस्ताव उद्या (गुरुवार) स्वीकारतील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

दरम्यान, या अधिवेशनामध्ये बोलताना विविध रिपब्लिकन नेत्यांनी आज डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्‍लिंटन यांच्यावर तिखट हल्ले चढविले. न्यू जर्सी राज्याचे गव्हर्नर ख्रिस ख्रिस्ती यांनी क्‍लिंटन या परराष्ट्र मंत्री असताना त्यांनी वापरलेल्या खासगी इमेल अकाऊंटसंदर्भातील उघडकीस आलेल्या माहितीवरुन त्यांना लक्ष्य केले. या प्रकरणी करण्यात आलेल्या चौकशीमध्ये क्‍लिंटन या "अत्यंत निष्काळजीपणे‘ वागल्याचा ठपका येथील "एफबीआय‘ने ठेवला आहे. यावरुन ख्रिस्ती व अन्य रिपब्लिकन नेत्यांनी क्‍लिंटन यांच्यावर टीका केली.

ट्रम्प यांनाच रिपब्लिकन पक्षाची उमेदवारी मिळणार, हे काही महिन्यांपूर्वीच निश्‍चित झाले होते. मात्र आज यावर अधिकृतरित्या शिक्कामोर्तब झाले. ट्रम्प व क्‍लिंटन यांच्यामधील लढत आता अधिक टोकदार होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 

टॅग्स

संबंधित बातम्या

Pune-Municipal
विठ्ठलवाडी रस्त्याची चौकशी करा

पुणे - विठ्ठलवाडी येथील नदीपात्रालगत बांधलेला २४ मीटर रुंद रस्ता काढण्याच्या कामाची चौकशी करावी, अशी मागणी पर्यावरण प्रेमींकडून केली जाऊ लागली आहे....

"म्हाळुंगे-माण' योजना तीन वर्षांत पूर्ण करणार 

पुणे - पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (पीएमआरडीए) म्हाळुंगे-माण येथील नगररचना योजनेतील (टीपी स्कीम) पायाभूत सुविधांच्या सहाशे कोटी...

विकासाच्या वेगाला हवे सुविधांचे लॅंडिंग 

देशातील औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात परकी गुंतवणूक होण्यासाठी हवा आहे तो पायाभूत सुविधांचा विकास. त्यादृष्टीने व्यवसाय आणि उद्योगांच्या...

रस्त्यांवर थुंकणाऱ्या तीनशे जणांना दंड 

पुणे - रस्त्यांवर थुंकणाऱ्यांना धडा शिकविण्यासाठी महापालिकेने कठोर पावले उचलली असून, तीनशे जणांवर दंडात्मक कारवाई केली. विशेष म्हणजे, अस्वच्छता...

Water
शहरात दुष्काळ; गावांत सुकाळ

पौड - मुळशी तालुक्‍याच्या पश्‍चिम पट्ट्यात भातपिकाच्या अतोनात नुकसानीमुळे दुष्काळाची छाया गडद झाली आहे. खाण्यासाठी दाणा आणि जनावरांसाठी पेंढाही...

Ananth Kumar
भाजपचा दक्षिणेतील चेहरा हरपला; अनंत कुमार यांचे निधन

बंगळूर : केंद्रीय स्ंसदीय कामकाज मंत्री व दक्षिण बंगळूरूचे खासदार अनंत कुमार (वय 59) यांचे आज (सोमवार) पहाटे कर्करोगाने निधन झाले. त्यांच्या मागे...