Sections

भरतभाईंनी तयार केले  आंतरमशागत, पेरणी यंत्र

अनामिका डे, अलजुबैर सय्यद |   सोमवार, 12 मार्च 2018

गुजरात राज्यातील पिखोर (ता. केशोद, जि. जुनागड) या लहानशा गावातील भरतभाई अग्रावत हे शेतीसाठी लागणाऱ्या छोट्या अवजारे निर्मितीतील संशोधक. भरतभाईंचे वडील अमृतभाई यांचा गावामध्येच लहानसा फॅब्रिकेशनचा व्यवसाय. त्यामुळे गावपरिसरातील शेतकऱ्यांच्या अवजारांची दुरुस्ती त्याचबरोबरीने शेतकऱ्यांच्या मागणीनुसार लहान अवजारे तयार करून देत होते. वडिलांच्या बरोबरीने लहानपणापासून अवजारे, यंत्रे दुरुस्ती करता करता भरतभाईंनादेखील नवीन संकल्पना सुचू लागल्या. यातूनच त्यांनी शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन छोट्या अवजारांची निर्मिती सुरू केली. 

गुजरात राज्यातील पिखोर (ता. केशोद, जि. जुनागड) या लहानशा गावातील भरतभाई अग्रावत हे शेतीसाठी लागणाऱ्या छोट्या अवजारे निर्मितीतील संशोधक. भरतभाईंचे वडील अमृतभाई यांचा गावामध्येच लहानसा फॅब्रिकेशनचा व्यवसाय. त्यामुळे गावपरिसरातील शेतकऱ्यांच्या अवजारांची दुरुस्ती त्याचबरोबरीने शेतकऱ्यांच्या मागणीनुसार लहान अवजारे तयार करून देत होते. वडिलांच्या बरोबरीने लहानपणापासून अवजारे, यंत्रे दुरुस्ती करता करता भरतभाईंनादेखील नवीन संकल्पना सुचू लागल्या. यातूनच त्यांनी शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन छोट्या अवजारांची निर्मिती सुरू केली. 

भरतभाईंनी ग्रामीण भागातील लोकांच्या अडचणी लक्षात घेऊन कूक स्टोव्ह, पाणी उपसण्यासाठी लहान पवनचक्की तयार केली. याचबरोबरीने आंतरमशागत आणि पेरणीसाठी  मजुरांची कमतरता आणि लहान शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेऊन अांतरमशागत आणि पेरणी यंत्राचीदेखील निर्मिती केली. या यंत्राला शेतकऱ्यांच्याकडून चांगली मागणी  आहे. हे यंत्र विकसित करण्यासाठी ग्यान संस्थेने त्यांना तांत्रिक आणि आर्थिक मदत केली आहे.

यंत्राने आंतरमशागत करता येते. तसेच गहू, भुईमूग, मका हरभरा सोयाबीन, एरंडी, तूर, मूग, उडीद, ज्वारी, जिरे, बाजरी, तीळ, कापूस या पिकांची पेरणी करता येते. दोन व्यक्तिंच्या सहाय्याने यंत्राने आंतरमशागत आणि पेरणी शक्य. गरजेनुसार यंत्रातील पेरणीचे अंतर बदलणे शक्य आहे. यंत्राला असलेल्या बियाणे टाकीची क्षमता तीन किलो. यंत्राने एकावेळी एका ओळीत पेरणी करता येते. यंत्राला दोन्ही बाजूने लहान सायकलची दोन चाके लावलेली आहेत. यंत्राची चाके आणि बियाणे टाकी एचडीपीची बनविलेली आहे.  हॅन्डेल आणि यंत्राचे इतर भाग लोखंडाचे आहे. बियाणे टाकीला रोटर जोडलेले आहेत. चाकामुळे यंत्र शेतात चालविण्यास सुरवात झाल्यानंतर रोटर फिरतात. त्यामुळे बियाणे योग्य अंतरावर पडत जाते. बियाणे प्रकार, पेरणीचे अंतर, पेरणीच्या खोलीनुसार रोटर बदलावे लागतात. यंत्रासोबत चार प्रकारचे रोटर उपलब्ध आहेत.  

पेरणी यंत्रासोबत तण नियंत्रणासाठी अवजार, बियाणे आकार आणि पेरणीच्या अंतरानुसार वेगवेगळे रोटर उपलब्ध, बियाणे पेरणीपूर्वी जमिनीत छिद्र घेण्यासाठीचे छोटे अवजार तसेच बियाणे पेरणीनंतर माती झाकण्याचे छोटे अवजार यास जोडता येते. 

यंत्राची किंमत २७०० रुपये आहे. पेरणीयंत्रासोबत इतर जोडणीची अवजारे नको असतील तर किंमत २४०० रुपये आहे.

०७९-२६७६९६८६ (ग्यान संस्था, अहमदाबाद, गुजरात)

Web Title: marathi news agrowon news bharatbhai

टॅग्स

संबंधित बातम्या

ऊसतोडणीकडे पाठ; एमआयडीसीची वाट

औरंगाबाद-  ऊसलागवड ते गाळपापर्यंतच्या प्रक्रियेत ऊसतोडणी अतिशय कष्टाची असते. ऊन, वारा, थंडी यांची कसलीही तमा न बाळगता मिळेल त्या ठिकाणी माळांवर...

amol udgirkar
बायो'पीक' (अमोल उदगीरकर)

दिवाळीमध्ये प्रदर्शित झालेल्या "आणि डॉ. काशिनाथ घाणेकर' या चित्रपटानं "ठग्ज ऑफ हिंदुस्थान' या चित्रपटाला जोरदार टक्कर दिली आणि रसिकांची दाद मिळवली....

dr shruti panse
मिळून सारेजण (डॉ. श्रुती पानसे)

मुलांसकट नवनवे अनुभव घेणं, त्यासाठी स्वतःला आणि पूर्ण कुटुंबाला सतत संपन्न करत राहणं, समृद्ध करत राहणं हा एक वेगळाच प्रवास असतो. मुलांसह समृद्ध...

sandeep kale
हसलेली झेंडूची फुले... (संदीप काळे)

आपल्या दोन विद्यार्थ्यांच्या तोंडून एका शिक्षकानं एक व्यथा ऐकली...झेंडूच्या फुलांची आणि त्यांच्या विक्रीविषयीची व्यथा...या व्यथेनं त्या शिक्षकाला...

samir abhyankar
गाण्यात इतरांची नक्कल नको (समीर अभ्यंकर)

शास्त्रीय असो वा उपशास्त्रीय सादरीकरण, श्रोत्यांना निराळं काहीतरी ऐकवण्यासाठी मी नेहमीच उत्सुक असतो. गाण्यात इतरांची नक्कल नसावी, स्वतःची अशी...

eco-cycle.jpg
जुन्या कपड्यांची नवी बाजारपेठ : पर्यावरणपूरक स्टार्टअप 

पुणे : 'टाकाऊ पासून टिकाऊ' या संकल्पनेला आपल्याकडे नेहमीच महत्त्व दिले जाते. याच संकल्पनेवर आधारित जुन्या कपड्यांचा पुनर्वापर आणि पुनर्निर्मिती करून...