Sections

साताऱ्यात ५८० कोटींचे पीककर्ज वाटप

सकाळ वृत्तसेवा |   गुरुवार, 12 एप्रिल 2018
Agriculture-Loan

सातारा - जिल्ह्यातील सहकारी व राष्ट्रीयीकृत बॅंकांकडून रब्बीसाठी शेतकऱ्यांना मार्चअखेर ५८० कोटी ७० लाख रुपये म्हणजेच ५३ टक्के पीककर्जाचे वाटप करण्यात आले. कर्जमाफीच्या घोळात सर्वच बॅंकानी कर्जवाटपाकडे दुलर्क्ष केले आहे. यामुळे कोणत्याही बॅंकेचे कर्जवाटप उद्दिष्ट पूर्ण झालेले नाही. कर्जवितरणाकडे जाणीवपूर्वक दुलर्क्ष करणाऱ्या बॅंकांवर कडक कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.  

सातारा - जिल्ह्यातील सहकारी व राष्ट्रीयीकृत बॅंकांकडून रब्बीसाठी शेतकऱ्यांना मार्चअखेर ५८० कोटी ७० लाख रुपये म्हणजेच ५३ टक्के पीककर्जाचे वाटप करण्यात आले. कर्जमाफीच्या घोळात सर्वच बॅंकानी कर्जवाटपाकडे दुलर्क्ष केले आहे. यामुळे कोणत्याही बॅंकेचे कर्जवाटप उद्दिष्ट पूर्ण झालेले नाही. कर्जवितरणाकडे जाणीवपूर्वक दुलर्क्ष करणाऱ्या बॅंकांवर कडक कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.  

जिल्ह्यात रब्बी हंगामाच्या सुरवातीपासून पीककर्जाचे वाटप सर्वच बॅंकांकडून संथ गतीने करण्यात येत होते. त्यानंतर टप्पाटप्प्याने पीककर्ज वाटपास गती आली. रब्बी हंगामासाठी ११०० कोटी १० लाख रुपये पीककर्जाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यापैकी मार्च महिनाअखेर ५८० कोटी ७० लाख रुपयांचे कर्जवितरण करण्यात आले. रब्बी हंगामात पीककर्ज वितरणात सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने आघाडी घेतली आहे. या बॅंकेचे ५४० कोटींचे उद्दिष्ट होते, त्यापैकी ४३९ कोटी ४० लाख रुपयांचे कर्जवितरण करत ८१ टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे. प्रमुख राष्ट्रीयीकृत बॅंकांची पीक कर्जवितरणाबाबत उदासीनता दिसून आली. यामध्ये स्टेट बॅंक ऑफ इंडियाने सर्वाधिक १९ कोटी ७५ लाखांचे म्हणजे उद्दिष्टाच्या १९ टक्के कर्ज वितरण केले. त्यानंतर बॅंक ऑफ महाराष्ट्रने १६ कोटी २४ लाखांचे म्हणजे उद्दिष्टाच्या १७ टक्के कर्ज वितरण केले आहे. बॅंक ऑफ इंडियाने १५ कोटी २९ लाख लाखांचे म्हणजेच उद्दिष्टाच्या १६ टक्के कर्ज वितरण केले आहे. राष्ट्रीयीकृत बॅंकांच्या तुलनेत खासगी बॅंकांनी पीककर्ज वितरणाकडे अधिक लक्ष दिले आहे. खासगी बॅंकांनी ११५ कोटी ५३ लाख पीककर्ज वितरण उद्दिष्टापैकी ५३ कोटी १२ लाखांचे कर्जवाटप केलेले आहे. खासगी बॅंकांनी एकूण उद्दिष्टापैकी केवळ ४६ टक्के कर्जवाटप केले आहे. 

सर्व बॅंकांची उद्दिष्टे अपूर्णच  रब्बी हंगामातील पीककर्ज वितरणासाठी मार्चअखेरपर्यंत मुदत असते. मात्र, कोणत्याही बॅंकेने उद्दिष्ट पूर्ण केलेले नाही. हंगामाच्या सुरवातीस अनेक राष्ट्रीयीकृत बॅंकांच्या व्यवस्थापनाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याने पीककर्ज वाटप कमी झाले. अनेक राष्ट्रीयीकृत बॅंकांनी उद्दिष्टाच्या तुलनेत ५० टक्‍क्‍यांपेक्षा कमी पीककर्जाचे वाटप केल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. या बॅंकांवर कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

Web Title: agro news 580 crore agriculture loan distribute

टॅग्स

संबंधित बातम्या

'महेश’ सुरु होणार ; आष्टीसह तीन तालुक्यांचा ऊसप्रश्न सुटणार

आष्टी (जि. बीड) : सहा वर्षांपासून बंद अवस्थेत असलेल्या तालुक्यातील जळगाव येथील महेश सहकारी साखर कारखाना सुरु होणार असल्याने आष्टीसह पाटोदा व...

सभासदांच्या घरावरुन नांगर फिरवून आमदारकीची स्वप्ने बघू नयेत : डॉ. मोहिते

रेठरे बुद्रुक : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे व्यवस्थापन बेफिकीरीने सुरु आहे. सभासदांच्या ऊसतोडी रखडतात. जलसिंचन योजना तोट्यात...

utagi
खुल्या अर्थव्यवस्थेमुळेच मोठे आर्थिक गैरव्यवहार : विश्‍वास उटगी

जळगाव : गेल्या काही वर्षांत झालेले आर्थिक गैरव्यवहार हे आपण स्वीकारलेली खुली अर्थव्यवस्था व कुबड्या भांडवलशाहीचा परिणाम आहे. बॅंक, मार्केट...

arun-jaitley
राहुल हे ‘विदूषक युवराज’

नवी दिल्ली - ‘राफेल’ विमान खरेदी सौदा व बॅंकांची बुडीत कर्जे (एनपीए) यावरून सरकारवर आक्रमक प्रहार करणाऱ्या काँग्रेसच्या अध्यक्षांना दिवसेंदिवस वाढत...

पीएनबी
आणखी तीन बॅंकांचे विलीनीकरण

नवी दिल्ली - सार्वजनिक क्षेत्रातील बॅंक ऑफ बडोदामध्ये विजया आणि देना बॅंकेला विलीन केल्यानंतर आठवडाभरात आणखी तीन बॅंकांचे विलीनीकरण करण्याची तयारी...